मुधोजी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; रक्तदान शिबिर व भित्तिपत्रकाचे उद्घाटन

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; ४४ रक्तदात्यांचे रक्तदान


स्थैर्य, फलटण, दि. 17 ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, ‘जागर महाराष्ट्राच्या लोककलेचा’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये १७ विद्यार्थ्यांनी ३७ रेखाचित्रे रेखाटली होती. तसेच, राष्ट्रीय सेवा योजना आणि फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमाला गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. संजय राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, उपप्राचार्या प्रा. उर्मिला भोसले, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी.पी. शिंदे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा विभागात सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष धुमाळ व प्रा. लीना शिंदे यांनी केले, तर आभार प्रा. काळेल यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!