दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम ब्रिलियंट अॅकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब फलटणचे प्रेसिडेंट श्री विजयकुमार लोंढे, सातारा जिल्हा गव्हर्नर लायन्स क्लबचे श्री भोजराज नाईक निंबाळकर तसेच सर्व लायन्स क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या वर्षी प्रथमच ब्रिलियंट अॅकॅडमी मार्फत सिस्काऊटचे मार्च पास करण्यात आले. याचे सर्व नियोजन मुख्याध्यापक डॉ. प्रफुल्ल अडागळे सर यांनी केले. माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी सिस्काऊटचे व्हाईट युनिफॉर्म मध्ये मॅर्चिंग करत झेंड्याला मानवंदना दिली. यावेळी लायन्स प्रेसिडेंट श्री विजयकुमार लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाप्रमुख श्री. दिलीपसिंह भोसले.. अॅड.सौ. मधुबाला भोसले, श्री तुषार गांधी. श्री राजाराम फणसे.
स्वयंसिद्धा औद्योगिक संस्थेच्या चेअरमन सौ. राजस भोईटे, ब्रिलियंट अकॅडमी चे सेक्रेटरी श्री रणजीतसिंह भोसले प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले. सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन श्री तेजसिंह भोसले, सद्गुरू व महाराजा संस्था समूहाचे सीईओ श्री संदीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. छोट्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे सादर केली. मुख्याध्यापक डॉ. प्रफुल्ल अडागळे सर यांनी यावेळी सी-स्काऊट मधील आव्हाने व त्याविषयी चे महत्व विद्यार्थी व पालकांना सांगितले. श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय संचालिका स्वाती फुले ,आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री घाटगे सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे प्राचार्य रेपाळ सर ,सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.