दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्या नगर परिषदेने न सोडविल्याने तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर या संघटनेच्या वतीने नगर परिषदेस सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात वारंवार निवेदन देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर १७ एप्रिलपासून संघटनेचे अध्यक्ष मनोज मारूडा यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचार्यांनी बेमुदत उपोषण नगर परिषदेसमोर सुरू केले आहे.
याबाबत संघटनेने म्हटले आहे की, फलटण नगरपालिका सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. संघटनेने बेमुदत उपोषणाचा इशारा देऊनही नगर पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही.
सफाई कर्मचार्यांच्या
- सफाई कामगारांची राहती घरे नावावर व्हावीत
- लाड-पागे कमिटीच्या शिफारशींनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती वर्ग – ३ मिळणेबाबबत
- सफाई कामगार यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळावा
- सफाई कामगारांना १०,२०, ३० प्रमाणे वेतन निश्चिती फरक मिळावा
- सेवानिवृत्त सफाई कामगार यांची देय रक्कम तात्काळ द्यावी
- कामगार वसाहतीला संरक्षण भिंत बांधावी
आदी मागण्या आहेत.