जिजामाता बँकेतील ठेवी परत मिळण्याची मागणी ठेवीदार व कर्जदारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । सातारा । जिजामाता महिला सहकारी बँक गेल्या पाच वर्षापासून गैरकारभारामुळे बंद आहे. कोरोनाच्या या संक्रमण काळात वृद्ध खातेदारांना आर्थिक चणचणीने जगणे अवघड झाले आहे. या बँकेतील खातेदाराच्या ठेवी तत्काळ परत मिळाव्या अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा ठेवीदार व कर्जदार सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी दिला आहे.

हे निवेदन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे की गेल्या पाच वर्षापासून बंद असलेल्या जिजामाता सहकारी बँकेला 30 एप्रिल 2019 रोजी आरबीआयने बॅक परवाना माघारी देऊन आता दोन वर्ष उलटली. तरीसुध्दा अद्यापही ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाहीत. कोरोनाच्या संकट काळात बँकेचे अनेक वृध्द खातेदार आर्थिक चणचणीमुळे अडचणीत आहेत. काही वृद्धांचा वैफल्यग्रस्तेतून मृत्यू झाला आहे. अन्य काही अनर्थ घडण्यापूर्वी सहकार विभाग, राज्य शासन यांनी जिजामाता बँक व्यवस्थापनाला ठेवीदारांच्या रकमा देण्यास भाग पाडावे, नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!