दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । मुंबई । गेल्या वर्षभरात इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्युशन्सची वाढ लक्षणीयरित्या झाली असून या एका वर्षात त्यांचा टर्नओव्हर दुप्पट झाला तसेच मनुष्यबळ देखील दुपटीने वाढले. या ब्रॅंडने हेल्थकेअर कंपन्यांना सध्याच्या नियम, इनोव्हेशन, किंमतीचे दडपण आणि भरपूर माहिती असणारे रुग्ण यांच्यामुळे आव्हानात्मक झालेल्या हेल्थकेअर वातावरणात स्पर्धात्मक फायदा देण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या साहाय्य केले आणि कंपनीने आपला टर्नओव्हर आणि मनुष्यबळ दुपटीने वाढवले.
इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्युशन्सचे संस्थापक आणि सीईओ डॉ. अनिश देसाई म्हणाले, “आम्ही भारतातील आघाडीच्या आणि एमएनसी फार्मास्युटिकल आणि न्यूट्रास्युटिकल कंपन्यांसोबत काम केले आहे. डेटा, डिफरन्सीएशन (विशिष्टता प्राप्त करणे), डिसेमिनेशन (प्रसार) आणि डिलिजन्स (परिश्रम) या चार Ds मुळे आम्ही यशस्वी झालो. आमचे तरुण आणि उत्साही जेन झेड प्रतिभावंत आमचे नेतृत्व करतात. विज्ञानाधिष्ठित कम्युनीकेशनवर आम्ही देत असलेला भर हा आमच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रूग्णांच्या बाबतीत चांगले परिणाम मिळावेत, आणि आरोग्य आणि कल्याण याबाबत ग्राहकांना त्यांचे ईप्सित साध्य करण्यास मदत म्हणून २०२२ मध्ये आम्ही भारतीय रुग्णांची सेवा करणार आहोत.”
इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्युशन्स रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यासाठी शैक्षणिक आणि जागरूकता आणण्यासाठीचे उपक्रम राबवते. रोगप्रतिकारकता, स्त्री-आरोग्य, सांध्यांचे आरोग्य आणि पोटाचे आरोग्य याबाबत भागधारकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्युशन्सने न्यूट्रास्युटिकल या क्षेत्रात काम केले आहे. रुग्णांना भेडसावणार्याे या सामान्य व्याधी आहेत आणि त्यांना या नेहमीच्या समस्यांसाठी पुराव्यावर आधारित शास्त्रीय माहिती हवी असते. इंटेलिमेडने एक्स्पर्ट न्यूट्रास्युटिकल अॅड्व्होकसी कौन्सिल (ENAC) सोबत मिळून न्यूट्रास्युटिकलच्या संकलनावर काम केले आहे, ज्याचा उपयोग भागधारकांना सर्वसामान्यतः वापरण्यात येणार्यान पोषक घटकांच्या बाबतीत शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी होईल. आरोग्य आणि कल्याण क्षेत्रातील उपभोक्त्यांना मदत करण्यासाठी म्हणून 2022मध्ये शैक्षणिक आणि जागरूकता उपक्रम चालू ठेवण्याची त्यांची योजना आहे, जेणे करून उपभोक्त्यांना शास्त्रोक्त आणि खरी माहिती मिळू शकेल. 2 सप्टेंबर रोजी त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय न्यूट्रास्युटिकल दिवस देखील जाहीर केला.
आरोग्य आणि कल्याण क्षेत्रात २०२२ मध्ये आणि त्यानंतर न्यूट्रास्युटिकलचा वर्चस्व असेल. न्यूट्रास्युटिकलच्या प्रचारात इंटेलिमेड आघाडीवर असेल आणि वातावरणाला आकार देण्याचे काम करेल.
फार्मास्युटिकल, न्यूट्रास्युटिकल, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल हेल्थ-टेक क्षेत्र यांनी बनलेल्या हेल्थकेअर क्षेत्रात काम करण्याचा इंटेलिमेड हेल्थकेअर सोल्युशन्सचा मानस आहे. 1ट्वेंटीएटी या हेल्थकेअर समुदायाच्या माध्यमातून इंटेलिमेड मलेशिया आणि सिंगापूरसारख्या SEA देशांमधील ग्राहकांना जागरूक आणि शिक्षित करण्याचे काम करत आहे.