उत्सवी काळात ‘कोव्हिड इसेन्शिअल फेस्टिव हॅम्पर्स’च्या मागणीत वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

मुंबई,
१७ नोव्हेंबर २०२०:
भारतातील आघाडीच्या बी२बी बाजारपेठांपैकी
एक असलेल्या ट्रेड इंडियाने विविध प्रकारच्या भेटवस्तूंच्या मागणीत मासिक वृद्धी झाल्याचे
जाहीर केले. सध्याच्या काळात कोव्हिड इसेन्शिअल फेस्टिव हँपर्सची मागणीही वाढल्याचे
कंपनीचे निरीक्षण आहे. आदर्श भेटवस्तूच्या पर्यायांमध्ये अल्कोहल आधारीत सॅनिटायझर
आणि जंतुनाशक स्प्रेसह टिकाऊ आणि उच्च दर्जाचे फेस मास्क असलेले गिफ्ट बॉक्स यांचा
समावेश आहे.

सप्टेंबर महिन्याच्या
अगदी उलट, ऑक्टोबर महिना विक्रीच्या बाबतीत फायदेशीर ठरला. या महिन्यात होलसेल चॉकलेटच्या
मागणीत तब्बल १२० टक्के वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात त्यांची संख्या ३६,९६८ वरून ८१,६३८
वर पोहोचली. याचप्रमाणे सेंटेड मेणबत्यांसारख्या पारंपरिक भेटवस्तूंची मागणीही ५६ टक्क्यांनी
वाढली. ऑक्टोबरमध्ये ६५८७ नगांनी मागणी वाढली. सप्टेंबर महिन्यात ती ४२०४ एवढी होती.
ऑक्टोबर महिन्यात ट्रेडइंडियाने किचनवेअरमध्ये ६९ टक्क्यांनी वृद्धी अनुभवली. ऑक्टोबर
महिन्यात १९००८ उत्पादनांची मागणी झाली तर सप्टेंबरमध्ये ती ११,२०० एवढी होती.

ट्रेडइंडियाचे
सीओओ श्री संदिप छेत्री
म्हणाले, “ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर
आमच्या विक्रीत हळू हळू होणारी वाढ पाहून आम्ही आनंदी आहोत. मेणबत्या आणि किचनवेअरसारख्या
पारंपरिक भेटवस्तूंच्या मागणीत वाढ झालीच. पण त्यानंतर चॉलेटसारख्या उत्पादनाच्या मागणीतील
आकडेवारीतही वाढ झाली. सध्याच्या काळाची गरज म्हणून यावर्षी कोव्हिड संबंधी भेटवस्तू
पॅकेजचाही बाजारात समावेश झाला. यात आवश्यक फेसमास्क, हँड सॅनिटायझर आणि जंतुनाशक स्प्रे
यांचा समावेश आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!