जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा : खा. उदयनराजे

 नूतन जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी जलमंदिरवर जावून घेतली भेट


सातारा  – प्रियाताई शिंदे यांच्या सत्कार करताना खा. उदयनराजे भोसले शेजारी राजूभैय्या भोसले, सुनील काटकर व इतर.
स्थैर्य, 23 मार्च, सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा देशासह राज्यात नावलौकिक आहे. हा नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी तुमच्यावर जबाबदारी आहे. सर्वांना बरोबर घेवून काम करुन जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांनी जलमंदिर येथे जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. खा. उदयनराजे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, बुके व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देत स्वागत केले. यावेळी खा. उदयनराजे यांनी दोघांनाही सन्मानाने गाडीत बसवले. यावेळी राजू भोसले म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असून त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची स्थापना झाली त्या जिल्हा परिषदेवरपहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज दर्जदार करणार असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यकआहे. वाड्यावस्त्यांवर शासनाच्या सर्व योजना पोहोचल्या आहेत. त्याला अनुसरून जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवर जावून तेथील अडीअडचणी जाणून घेवून विकासकामाला प्राधान्य देणार आहे. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडणूक लढली आहे. त्यानंतर आम्हाला पदे मिळाली. खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजू भोसले व खा, उदयनराजे यांच्यात रंगतदार किस्से घडले. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, अजित साळुंखे यांच्यासह भाजपचे नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!