संजय गांधी निर्धार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदानवाढ

UDID कार्ड सादर करण्याचे आवाहन


स्थैर्य, 12 मार्च, सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आले आहे.

या योजनांचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड आधार कार्ड शी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे २० मार्च २०२६ पूर्वी तहसील कार्यालय, सातारा येथील संजय गांधी शाखेत जमा करावे असे आवाहनसमीर यादव  तहसीलदार सातारा यांनी केले आहे.

 ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांनी ते जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काढून घेण्याचेही सांगण्यात आले आहे. योग्य वेळी कागदपत्रे सादर केल्यास वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!