स्थैर्य, विडणी: फलटण तालुक्याच्या विडणी गावामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून विडणी गावामध्ये कोरोनाचे अर्धशतक पूर्ण झालेले आहे. लॅाकडाउन करूनही विडणी गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. लॅाकडाउन संपले तरीही नागरिक आता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर विडणीकरांनी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे जाणकारांचे मत आहे.
फलटण तालुक्यामध्ये ॲाक्सीजन बेड मिळणे हे अवघड झाले आहे. त्यामुळे विडणी गावामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करून विडणी गावातील ग्रामस्थांना विडणीमध्येच उपचार देण्यात यावेत. यासाठी विडणी गावातील दानशुर मंडळींनी पुढे येऊन सहकार्य करावे व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित येऊन सुसज्ज असे विडणी येथे कोरोना केअर सेंटर उभे करावेत असेही मत विडणीकर व्यक्त करीत आहे
विडणी गावामध्ये कोरोनाचे एकूण पन्नास रुग्ण झालेली असून चार रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.