मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, पवार म्हणतात – ‘सरकारचं आमच्यावर जास्तच प्रेम दिसतंय’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे वृत्त आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आयकरविभागाने नोटीस पाठवल्याची माहिती आहे.

पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मला काल नोटीस आली आहे. या नोटीशीत काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.’

लवकरच उत्तर देईल

शरद पवार म्हणाले की, 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या नोटीशीचे उत्तर मी लवकरच देईल असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभागाने नोटीशी पाठवल्या आहेत. निवडणुकांमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत या नोटीशी असल्याची माहिती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!