स्थैर्य, सातारा दि. 6 : पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नसल्याने तो करण्याविषयी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेशपिक विमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.
तसेच महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व महाबळेश्वर महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पिक विमा योजनेमध्ये होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. याचाही पाठपुरावा कृषी विभागाने केल्याने चालू खरीप हंगामापासून महाबळेश्वर व पाचगणी महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पिक विमा योजनेमध्ये करण्यात आला आहे.
फळपिक विमा योजनेमध्ये जिल्हयातील ४ हजार ९०२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविले असून २ हजार ४२२ हे. क्षेत्र संरक्षित केले आहे. तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेत जिल्हयातील २६ हजार ४०६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून सुमारे १० हजार हे. क्षेत्र संरक्षित केले आहे, अशीही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी दिली आहे.