गोवारी समाजाचा शबरी घरकुल योजनेत समावेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, भंडारा, दि. ३१ : शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता माझे प्रयत्न सुरू असून प्राथमिकतेच्या आधारावर ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. शेतकरी व पशुपालक यांना आर्थिक रित्या सबळ करण्यासाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तालुक्यातील ग्राम सालेभाटा येथे आयोजित प्रथमतः शबरी घरकुल योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गोवारी समाजातील कुटुंबांना मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकाम भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नाने शासनाच्या नवीन आदेशानुसार पहिल्यांदाच गोवारी समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबियांना शबरीघरकुल योजनेंतर्गत घरकुलाचे लाभ मिळणे सुरु झाले असून ग्राम सालेभाटा येथे गोवारी समाजाच्या ४१ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचे भूमिपूजन कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी गोंदिया ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष दिपेन्द्र कटरे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, एकोडी च्या सरपंच भूमीचा तिडके, खंडविकास अधिकारी शेखर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी रमाई घरकुल योजनेंतर्गत निर्मित २५ घरकुल लाभार्थ्यांचे गृहप्रवेश माननीय पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाना पटोले खासदार असताना सात लाख रुपये निधी ने मंजूर केलेले हनुमान मंदिर समोरील सभागृहाचे लोकार्पण सुद्धा पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बहुसंख्येने ग्रामवासी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!