पेट्रोलचे पैसे न देता पलायन संगमनगर येथील घटना; तिघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । कारमध्ये चाळीस लिटर डिझेल भरले. यानंतर पैसे न देताच कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसका मारुन तिघांनी पलायन केले. ही घटना दि. १ मार्च रोजी संगमनगर,सातारा येथील पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नीलेश महादेव शेलार रा. सैदापूर, ता. सातारा यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल पारेख वय ३४, रा. गणेश कॉलनी, संगमनगर, सातारा यांचा संगमनगर खेड येथे पेट्रोल पंप आहे. दि. १ रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पेट्रोल पंपावर असेंट कार क्र.एमएच १२ डीएस-१२७०ही पेट्रोल भरण्यासाठी आली. कारमधील व्यक्तीने चाळीस लिटर डिझेल भरण्यास सांगितले. त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ३ हजार ७४९ रुपयांचे डिझेल भरले. पैसे मागितले असता त्यातील एकाने हाताला हिसका मारून कारसह पलायन केले. या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरून कारचा नंबर आणि नाव शोधून काढलं. सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!