जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या इमारती नमुना नकाशे संकल्प चित्र स्पर्धेच्या वेब पोर्टलचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या इमारती नमुना नकाशे संकल्प चित्र स्पर्धेच्या  वेब पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, सातारा येथे कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले व उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा नियोजन समिती, सातारा यांच्या निधीमधून जिल्हा परिषद, सातारा यांच्यामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम जसे शाळा इमारत बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे, पशुसंवर्धन दवाखाना इमारतीबाबत मान्यता प्राप्त वास्तुविशारद यांची स्पर्धा घेऊन या मधून प्रत्येक भागा करीता तीन निवड नकाशे निवडून त्यांना बक्षीस रक्कम देऊन त्यापैकी सर्वोत्तम नकाशा निवडून भविष्यात या प्रमाणे इमारती बांधण्याची संकल्पना आहे. ही स्पर्धा माहे फेब्रुवारी 2022 मध्ये वेब पोर्टलद्वारे घेतली जाणार आहे. या स्पर्धेकरिता नामांकने 28 जानेवारी 2022 पासून स्विकृत केली जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!