दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । फलटण । शहरामधील फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू प्राथमिक शाळा, हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण नगरपरिषदेच्या वतीने विज्ञान प्रयोगशाळा, साहित्य व स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्याचे उद्घाटन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.
फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इम्रान नियाज अहमद कुरेशी, हाजी नियाजअहमद कुरेशी, हाजी सलीम कुरेशी, हाजी शकुर कुरेशी, हाजी निजाज आतार, हाजी शकील आतार, समीर तांबोळी, पप्पू शेख, सैफुल्ला शेख, श्री शेख, श्री आतार त्यासोबतच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.