आसियान-इंडिया आर्टिस्ट्स कॅम्पच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । मुंबई ।  आसियन-भारत संवाद संबंधांच्या ३० वर्षपूर्तीला साजरा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय (एमईए) आणि सेहेर यांनी आयोजित केलेल्या आसियान-भारत आर्टिस्ट्स कॅम्पच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन नवी दिल्लीत करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) श्री. सौरभ कुमार हे प्रमुख पाहुणे होते, तसेच एमईएचे अधिकारी, भारतातील आसियान मिशनचे अॅम्बेसेडर आणि अतिथी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाची थीम ‘ओशियन्स ऑफ कनेक्टिव्हिटी’ आहे, जी हे आसियान देश ज्या महासागरांशी जोडलेले आहेत त्या महासागरांचे प्रतीक आहे.

उद्घाटनादरम्यान आसियान कलाकार व भारतीय कलाकारांची एमईए अधिकारी आणि इतर अतिथींशी ओळख करून देण्यात आली. शिबिरात सहभागी होणारे आसियान देशांतील दहा कलाकार आहेत – समृत केओ – कंबोडिया, एडी सुलिस्ट्यो – इंडोनेशिया, मेलिसा अबुगा-ए – फिलिपाइन्स, आय म्याट सो – म्यानमार, नबिल फिकरी बिन हरोंली – ब्रुनेई दारुसलाम, सोन खुनपसेउथ – लाओ पीडीआर, एड्रोजर रोसिली – मलेशिया, गुयेन फुओंग लिन्ह – व्हिएतनाम आणि फत्तरापोर्न लीनपनित – थायलंड.

भारताकडून सोनिका अग्रवाल, जपानी श्याम, नुपूर कुंडू, लैश्राम मीना देवी, अंजुम खान, निन तनेजा, वनिता गुप्ता, योगेंद्र त्रिपाठी, मयूर कैलाश गुप्ता, दिलीप धर्मा आणि बसंत भार्गव या शिबिरात सामील होत आहेत.

या शिबिरात भेट देणा-या कलाकारांना भारतातील इतर कला आणि परंपरेची ओळख करून देण्यासाठी अनेक आंतरविद्याशाखीय क्रियाकलापांचा समावेश असेल. व्याख्यान प्रात्यक्षिके, परिसंवाद, चर्चा आणि इतर शैक्षणिक भेटी या शिबिराचा एक भाग असतील. या शिबिरात सुप्रसिद्ध चित्रकार समिंद्रनाथ मजुमदार हे देखील मार्गदर्शक आहेत.

एमईएचे सचिव (पूर्व) श्री. सौरभ कुमार म्‍हणाले, ‘’आम्ही आसियान भारत संवाद संबंधाचा ३०वा वर्धापन दिन साजरा करत असताना हा आर्टिस्ट कॅप्स १० आसियान देश व भारतामधील सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण तरूण-केंद्रित उपक्रम आहे. भारत व आसियानदरम्यान पीपल-टू-पीपल व सांस्कृतिक संबंध वाढवणे हा विद्यमान आसियान-भारत सहभागांचा भाग आहे. आर्टिस्ट्स कॅम्पचा भारत आणि आसियान यांच्यातील सर्जनशील देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेण्याचा मानस आहे, तसेच दोन्ही देशांतील लोकांमधील समजूतदारपणा वाढवण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करत आहे.”

सेहेरचे संस्थापकीय संचालक संजीव भार्गव म्हणाले, ‘’आसियान-इंडिया आर्टिस्ट्स कॅम्पच्या दुसऱ्या पर्वामधून स्पष्टपणे दिसून येते की, पहिले पर्व भारत व आसियान देशांतील लोकांना एकत्र आणण्यात अत्यंत यशस्वी ठरले. हे शिबिर उदयपूर येथे होणार असून तेथे कलाकार आपली कला निर्माण करतील, एकमेकांसोबत वेळ व्यतित करतील आणि विचारांची देवाणघेवाण करतील. त्यांना सर्व सहभागी देशांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारशाची देखील ओळख करून दिली जाईल.”


Back to top button
Don`t copy text!