कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे – मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । मुंबई । कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे व आवश्यक आहे तेथे डांबरीकरण करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा तसेच सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.

यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीरगृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेनाराज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरराज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्नेराज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशीकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहियापोलिस अधीक्षक समीर शेखअतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडेराष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलारराष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडेएल ॲण्ड टी कंपनीचे परेश वारुळेरवींद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  विहे घाटातील डांबरीकरणमल्हार पेठेतील काँक्रिटीकरणनवसरी येथे डांबरीकरणनाडेअडूळम्हावशी येथील काँक्रिटीकरणाचे काम आठ दिवसांच्या आत सुरु करुन तातडीने पूर्ण करावे. तसेच पाटण ते संगमनगर धक्का व संगमनगर धक्का ते घाट माथा या रस्त्याचे  काम डांबरीकरणातून तातडीने पूर्ण करुन महामार्ग वाहतूक योग्य करावा. तसेच या रस्त्याच्या निविदेची फेर प्रक्रिया लवकर पूर्ण करुन सहा महिन्यांच्या आत काम सुरु करावे.  एल ॲण्ड टी  कंपनीने या रस्ता कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन गरज पडेल तिथे स्थानिकांच्या मदतीने काम मार्गी लावावे. हे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय ठेवावाअशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबतचा आढावा

सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाला हस्तांतरीत करण्याविषयी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी महसूलगृह व राज्य उत्पादन शुल्क विभागाने चर्चा करुन याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांच्या शासकीय निवासस्थानासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन  द्यावीअशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी योवळी केल्या.


Back to top button
Don`t copy text!