जलतरण तलाव नुतणीकरणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । सातारा । जिल्हा क्रीडा संकुल समिती, सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लॅन्टचे १कोटी ३५ लक्ष रुपयांचे नुतणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जलतरण तलाव सर्वांकरिता खुला करण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी ठेकेदार यांनी केलेल्या कामाचे कौतुक करुन या सुविधेचे सातारा जिल्ह्यातील अद्ययावत सुविधा उपलब्ध होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, ठेकेदार मिलींद कदम, अभिजीत पाटील, प्रमोद भगत आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!