ज्ञानसागरमधील क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात – पोलिस अधीक्षक आनंद भोईट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । सावळ । ज्ञानसागर गुरुकुल सावळमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव 2022-23 उद्घाटन झाले.वार्षिक शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व जिवनात किती आहे. याबद्दल मार्गदर्शन केले याठिकाणी बोलत असताना त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील घटनांना उजाळा दिला. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये सहभाग घ्यावा. त्यापासून प्रेरणा मिळते. व करियर निवडताना सुध्दा त्याचा कशाप्रकारे भविष्यात फायदा होऊ शकतो. हे यावेळी सांगितले. उदाहरण देताना त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य संपादन केल्यास थेट उपविभागीय पोलिस अधिकारी उपजिल्हाधिकारी अशा पदावर काम करता येऊ शकते. त्याच बरोबर आताची पिढी ही मोबाईल मध्ये व्यस्त आहे. मोबाईल फोन हा फक्त अर्धा ते एक तास वापरावा. व इतर वेळ खेळात घालवावा त्याचा फायदा होऊ शकतो. असेही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर खेळाचेही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते आहे.राष्ट्रीय छात्र सेना व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केलेले संचलन, कलर पार्टी सोहळा,मशाल फेरी,क्रीडा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

रुई व जळोची शाखेच्या प्री प्रायमरी विभागाकडून कोळी नृत्य,देशभक्ती गीत,व सावळ येथील प्री प्रायमरी विभागाचा बेरी नृत्य, माध्यमिक विभागाचा झुंबा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सागर आटोळे यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे सर यांनी मुलांना खेळाचा शपथविधी घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्रीराम सावंत व आभार सहशिक्षिका वर्षा होले यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे,सचिव मानसिंग आटोळे,उपाध्यक्षा रेश्मा गावडे,संचालिका पल्लवी सांगळे,सीईओ संपत जायपत्रे ,दीपक बीबे,विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते ,राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!