
दैनिक स्थैर्य | दि २६ सप्टेंबर २०२२ | फलटण | येथील · श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सभारंभ उद्या मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते १०.०० या वेळेत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो – खो असोशिएनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर,पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.