
दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । परेल । वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई, परेल वार्डाच्या वतीने बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव व मुंबई संघटक प्रमुख मनोज मर्चंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शिवडी विभाग, गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजभाऊ तथा रामदास गमरे, जिल्हा प्रतिनिधी प्रमोद जाधव, मुंबई सचिव राकेश कांबळे, वरळी वार्ड अध्यक्ष अमोल साळुंके, तालुका अध्यक्ष दिनेश कदम, तालुका सचिव राजेश जाधव, तालुका उपाध्यक्ष सलीम खान, रमेश धुमाळ तसेच सुरेश कदम, प्रमोद घुगे, सुनील जाधव, प्रकाश जाधव, अजित मोरे, नितीन जाधव, अनंत मोहिते,लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असून प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांचे महत्व उपस्थितांना पटवून दिले व यापुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सरतेशेवटी अध्यक्ष विद्याधर गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.