
दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। विडणी । विडणी (कोल्हे मळा) ता. फलटण येथे माजी आमदार दिपक चव्हाण यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत नवीन इलेक्ट्रिक डी.पी.चा शुभारंभ माजी जिल्हा परिषदेेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी सरपंच शरद कोल्हे तसेच विडणी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विडणी सोसायटीचे चेअरमन, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या काळामध्ये विडणी गावचा करण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आपण कुठेही कमी पडणार नाही, असे मत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.