
स्थैर्य, फलटण, दि. 27 सप्टेंबर : मौजे बरड (ता. फलटण) येथे ‘नायरा एनर्जी’च्या ‘मातोश्री पेट्रोल पंप’चा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या पेट्रोल पंपचा शुभारंभ महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपक चव्हाण हे असणार आहेत.
या सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. तसेच नायरा एनर्जी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण तालुका दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संचालक, तसेच पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. महेंद्र गांधी, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, डॉ. सौ. सौदामिनी गांधी, ॲड. पुष्कराज शेंडे, यश गांधी, डॉ. सौ. सुचिता शेंडे आणि सौ. शितल शेंडे यांनी केले आहे.