स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हिड हेल्थ केअर सेंटरचे उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ११ : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मधून साकारलेले माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हिड हेल्थ केअर सेंटरचे उद्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन उद्घाटन होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

सदरील कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावस्कर, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, फलटणच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांच्यासोबतच फलटण शहरासह तालुक्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलचे पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराचे अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली.

लोकनेते माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हिड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन उद्या दिनांक १२ मे २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदरील कोव्हीड हेल्थ केअर सेंटर मध्ये ५० ऑक्सिजनचे बेड्स व ५० सर्वसाधारण बेड्स असे एकूण मिळून १०० बेड्स असणार आहेत. फलटण शहरासह तालुक्यांमध्ये कोरुना या रोगाने थैमान घातलेले आहे अशा मध्ये फलटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ही पुरती कोलमडून गेलेली आहे यासाठीच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन फलटण येथील उत्कर्ष लॉज येथे कोव्हीड हेल्थ केअर सेंटर सुरू केलेले आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर कोव्हीड हेल्थ केअर सेंटर मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण यंत्रणा उभी केलेली आहे. त्यासाठी आलेला संपूर्ण खर्च हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः केलेला आहे. शासनाच्या वतीने आगामी काळामध्ये येथे वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा या शासनाच्या वतीने पुरवल्या जाणार आहेत. त्यासोबतच येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!