कोविड संसर्ग प्रतिबंधक लस पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थित होणार शुभारंभ


स्थैर्य, सातारा दि. १५: कोविड संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून 16 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहे. यांचा जिल्यारात शुभारंभ कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ कार्यक्रम होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे आमदार दिपक चव्हाण, ग्रामीण रुग्णालय पाटण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, ग्रामीण रुग्णालय माण येथे आमदार जयकुमार गोरे, मिशन हॉस्पीटल वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!