स्थैर्य, दहिवडी, दि.२०: जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध मनुष्यबळात काम करताना प्रशासनाची कसरत होत आहे या पार्श्वभूमीवर म्हसवड ता.माण जि. सातारा येथे लोकसहभागातून उभारलेल्या कोरोना(कोविड १९) सेंटरचे उदघाटन विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.सदर कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
याप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, नागराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्ष सौ.स्नेहल सुर्यवंशी, म्हसवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कोडसकर, मुख्याधिकारी सचिन माने, धनाजी माने, डॉ.प्रमोद गावडे, कैलास मोटे, डॉ.राजेंद्र मोडणे, असिफ काझी, शिवसेना शहर प्रमुख राहुल मंगवळे, ऍड.अभिजित केसकर, प्रशांत दोषी तसेच आजी – माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.