होली स्पिरीट सेंटरचे सोलापुरात उदघाटन


स्थैर्य, सोलापूर, दि.७:  होली  स्पिरीट फिजीओथेरपी  सेंटरचे फादर डॅनियल पॉल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लक्ष्मी-तुका संकुल युनिक हॉस्पिटलजवळ, सोलापूर येथे हे सेंटर आहे.

डॉ. राजेश सांगे आणि डॉ. प्रकाश सांगे यांनी सुरु केलेल्या या सेंटरमध्ये खेळाडूंना होणाऱ्या दुखापती, वयस्कर व्यक्तिंना होणाऱ्या दुखापती, अपघातातून झालेल्या दुखापतीवर उपचार केले जाणार आहेत. डॉ.राजेश सांगे यांनी फिजीओथेरेपी विषयातून पदवी प्राप्त केली असून त्यांना पाचवर्षाचा अनुभव आहे.  डॉ. प्रकाश सांगे यांनीही फिजीओथेरपी क्षेत्रातील पदवी घेतली आहे. त्यांना तीन वर्षाचा अनुभव आहे. सेंटरमध्ये उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, असे डॉ. राजेश सांगे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!