दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रख्यात व तज्ज्ञ प्राध्यापक गोकुळ कोंडीबा मोरे यांचे चिरंजीव डॉ. अभिषेक गोकुळ मोरे (बीडीएस, डेंटल सर्जन) यांच्या एकदंत दातांचा दवाखाना व इम्प्लांट सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वरा कॉर्नर, गिरवी नाका, फलटण येथे संपन्न झाले.
दंतरोग चिकित्सा, हिरड्यांचे रोग, वेडेवाकडे दात सरळ करणे तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे ‘रूट कॅनाल’ करणे, कवळी आणि इम्प्लांट असे विविध प्रकारचे उपचार एकदंत दातांचा दवाखाना आणि इम्प्लांट सेंटर मध्ये केले जाणार आहेत.
सर्व अत्याधुनिक मशीनद्वारे सुसज्ज असलेल्या या दातांच्या दवाखान्याचा लाभ फलटणमधील दंतरोग झालेल्या रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अभिषेक मोरे यांनी केले आहे.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. अभिषेक मोरे यांना आधुनिक दातांचा दवाखाना सुरू केल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या उद्घाटन समारंभास प्रा. श्री. गोकुळ कोंडीबा मोरे, सौ. कांचन गोकुळ मोरे, डॉ. सौ. पूनम विकास पाटील, डॉ. श्री. विकास दत्तात्रय पाटील यांच्यासह डॉ. अभिषेक मोरे यांचा मित्रपरिवार व फलटणकर नागरिक उपस्थित होते.