स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आयोजित जिल्हास्तरीय मोफत आरोग्य मेळाव्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा ।  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पंचायत समिती, सातारा व इंडियन मेडिकल असोसिएशन व  स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जिल्हास्तरीय मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील वैघकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी खासदार श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगला लाभ होणार असून या मेळाव्यात निदान व उपचार केले जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यापुढेही अशा प्रकारे आरोग्य मेळाव्याचे जिल्ह्यात आयोजन  करावे, असेही त्यांनी सांगितले.

या मेळाव्यामध्ये आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत ई कार्ड, गोल्डन कार्ड नोंदणी करुन देण्यात  आली.


Back to top button
Don`t copy text!