दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । सातारा । चैनई येथे आयोजित ऑलिम्पीयाड स्पर्धेच्या प्रचार व प्रसार तसेच बुध्दीबळ खेळाकडे खेळांडूना आकर्षित करण्याकरिता व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सातारा जिल्हा बुध्दीबळ असोसिएशनच्या वतीने दि. 3 ऑगस्ट 22 रोजी बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे अन्टी करप्शन ब्युरो मुंबईचे नारायण जाधव, उप शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी विक्रम दाभाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून इ. 1 ली ते 5 वी व इ. 6 वी ते 10 वी या दोन गटामध्ये एकूण 497 खेळाडू सहभागी झाले आहेत.
यावेळी माजी शिक्षण सभापती जयवंतराव ढाणे, तालुका क्रीडा अधिकारी हितेंद्र खरात, अनिल सातव, आर. वाय. जाधव, राजेंद्र माने, मोहन पवार उपस्थित होते.