दैनिक स्थैर्य । दि. 5 आक्टोंबर 2024 । फलटण । ग्रामपंचाय आंदरुड तथा राजेगट आंदरुडच्यावतीने गावामध्ये मंजूर झालेल्या विकासकामांचा भूमीपूजन समारंभ तर पूर्ण झालेल्या विकासकामांच्या उदघाटनाचे आयोजन विधान परिषदचे सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते तर आ. दिपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती बाजार समितीचे संचालक शंभूराज विनायकराव पाटील यांनी दिली.
आंदरुड गावामध्ये चाँदखान मंदिर ते गोसावी मठाकडे जाणार्या रस्त्योचे सिमेंट काँक्रिटिकरण, शिंगणापूर रोड ते ग्रामपंचाय कार्यालय रस्त्यापर्यंतचे डांबरीकरण, दक्षिणमुखी मारुती मंदिराचे सभामंडप, जाधव घर ते आढाव घर रस्ता, शिंगणापूर रोड ते जाधवघर खडीकरण व मुरुमिकरण, आढाव घर ते भवानीनगर रस्ता, ग्रामपंचायत समोरील चौकाचे काँक्रिटीकरण, डॉ. बागवान घर ते कुंभार घर बंदिस्त गटार योजना, भगवान अडागळे घर ते सत्यवान अडागळे घर बंदिस्त गटार व रस्त्याचे काँक्रिटिकरण, सागर राऊत दुकान ते सुभाष राऊत घरापर्यंत बंदिस्त गटार जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना ही सर्व विकासकामे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहितीसुध्दा शंभूराज पाटील यांनी दिली.
तरी आंदरुड गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने रविवार दि. 6 आक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आंदरुड ग्रामपंचायत व आंदरुड विकास सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.