स्त्री रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन


स्थैर्य, यवतमाळ, दि. १३: जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर त्वरीत उपचार व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरी पवार, उपजिल्हाधिकारी सविता चौधर आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी परिचारिका दिनानिमित्त फ्लोरेंन्स नाईटींगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून पालकमंत्र्यांनी अकस्मिक विभाग, प्रयोगशाळा, स्वॅब टेस्टिंग केंद्र, फिवर क्लिनीक, नमुना संकलन कक्ष, रक्त तपासणी आदींची पाहणी केली. तसेच उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करा, अशा सूचना दिल्या.

येथील स्त्री रुग्णालयात एकूण 180 बेड नियोजन असून सद्यस्थितीत 100 बेड उपलब्ध आहेत. तर 80 बेड प्रस्तावित आहेत. यात ऑक्सीजन बेड 42 आणि नॉर्मल बेड 58 आहे. तसेच सेंट्रल ऑक्सीजन पाईपलाईनचे 42 पॉईंट असून 10 लिटर प्रति मिनीट क्षमता असलेले पाच ऑक्सीजन कॉन्सेंन्ट्रेटर आहे. तसेच 20 किलो लीटर लिक्विड ऑक्सीजन टँक आणि प्रस्तावित 608 एलएमपी ऑक्सीजन प्लांट व प्रतिदिवस 135 जंबो सिलींडरचे नियोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!