दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । पुणे । भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ‘ससून क्वार्टर परिसरातील ‘बालविकास शिक्षण संस्था प्राथमिक शाळा येथे युवकमित्र परीवार महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फ मोफत ‘बालवाचनालय स्थापन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ,चॉकलेट वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला. सोबतच नागरिकाना मतदार नोंदणीचे आवाहन व जनजागृती करण्यात आले.
ससून क्वार्टर परिसरातील या शाळेत वस्ती परिसरतील वंचित बालके शिक्षण घेतात. यावेळी बालकांना लिहता वाचता यावे,अंकज्ञान मिळावे,वाचनाची गोडी लागावी यासाठी ‘बालवाचनालय’स्थापन करण्यात आल्याचे युवकमित्र चे प्रवीण महाजन यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना छान गोष्टीची पुस्तके,उजळणी पुस्तके मोफत भेट देण्यात आली. नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,प्रमुख अतिथि म्हणून ज्ञानरंजन फाउंडेशनचे संस्थापक श्री.रामचंद्र पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती सविता जाधव,सुवर्णा पाटिल,रेशमा काची,विना सालुंके, भारती जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधा जोगदेव,सद्गुरू सेवा चे सचिन म्हसे यांचे सहकार्य लाभले.