कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कोशिंबळेत उद्घाटन


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | दापोली |
कृषी महाविद्यालय दापोली व कृषी विज्ञान केंद्र रोहा यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम कोशिंबळे यांच्या उपक्रमांतर्गत कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन डॉ. भट सर व डॉ. मयेकर सर (शास्त्रज्ञ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. मनोज तलाठी सर, कृषी विज्ञान केंद्र जिल्हा रोहाचे प्रमुख व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जीवन आरेकर सर, डॉ. प्रमोद मांडवकर सर, डॉ. राजेश मांजरेकर सर, डॉ. सुधाकर पाध्ये सर व कोशिंबळे गावातील व आसपासच्या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विविध प्रकारच्या रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. त्यांचे औषधी गुणधर्म काय आहेत, हे शेतकर्‍यांना पटवून देण्यात आले. जैविक खताची माहिती, कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आंबा, भात, नाचणी, नारळ व भाजीपाल्याच्या सुधारित जाती व शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान याबद्दल माहिती या प्रदर्शनात शेतकर्‍यांना देण्यात आली.

यावेळी डॉ. भट सर, डॉ. मयेकर सर, डॉ. तलाठी सर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन गोडसे, ऋषभ मोरे, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, आकाश जाधव, सुमेध वाकळे, अनिश जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन डॉ. प्रमोद मांडगावकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. जीवण आरेकर सर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!