वाराणसीतील 600 कोटींच्या विकासकामांचे उद्धाटन


 

स्थैर्य, लखनऊ, दि.१०: पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी वाराणसीमधील विविध विकासकामांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
उद्धाटन आणि लोकार्पण केले आहे. या सर्व विकासकामांचे मूल्य जवळपास 614
कोटी रुपये होते. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी गंगा नदीसारखी पुढे जात असते.
त्यांनी ‘ आजकाल लोक, ’लोकल ते वोकल’ या सोबत ‘लोकल दिवाळी’ या मंत्राचा
सर्वत्र जयघोष केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक
व्यक्तीने स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्याचे आवाहन केले. स्थानिक
उत्पादनांची खरेदी आणि गुणवत्ता जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत, असं आवाहन
नरेंद्र मोदींनी केले.

नरेंद्र मोदी यांनी विकासाचा प्रकाश
सर्वत्र जात आहे. सर्वत्र बदल होत आहे. हे सर्व वाराणसी आणि वाराणसीमधील
जनतेच्या आशीर्वादामुळं होत असल्याचे म्हटले. वाराणसीमधील सांडपाणी
प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दिली. गंगा नदीच्या पाण्यामध्ये मिसळणारे सांडपाणी मिसळू नये म्हणून
वळवण्यात येणार आहे, त्याच्या डाईवर्जन लाईनच्या कामाचा शुभारंभ नरेंद्र
मोदींनी केला.

नरेंद्र मोदी यांनी लाईट अँड साऊंड
कार्यक्रमाचे लोकार्पण केले. यामुळे सारनाथची भव्यता वाढणार असल्याचे
सांगितले. काशीमधील नागरिक लाईटच्या तारांच्या समस्येतून मुक्त होतील,
असंही त्यांनी सांगितले.

काशीमधील वाहतूक सोयींचा विकास आमची
प्राथमिकता राहिली आहे. काशीमधील नागरिक आणि काशीमधे येणारे भाविक यांना
रस्ते मार्गाशिवाय इतर सोयी उपलब्ध व्हावेत, म्हणून प्रयत्न केले. ‘बाबतपूर
शहराला जोडणा-या मार्गामुळे वाराणसीची नवी ओळख बनली आहे. वाराणसीमध्ये सहा
वर्षापूर्वीपेक्षा विमान प्रवासाच्या सोयी वाढल्याचे नरेंद्र मोदी यांनी
सांगितले. नरेंद्र मोदींनी काशीमध्ये एका कामाचे उद्धाघटन करतो तेव्हा
दुस-या कामाचे लोकार्पण केले जाते, असेही म्हटले.

भारतातील गावे, गरीब नागरिक, शेतकरी
आत्मनिर्भर भारत अभियानाचे सर्वात मोठे आधारस्तंभ आणि ते खरे लाभार्थी
आहेत. कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली त्याचा फायदा वाराणसी,
पूर्वांचल, उत्तर प्रदेशच्या सर्व शेतक-यांना होणार आहे. नव्या कायद्यामुळं
शेतकरी थेट बाजारपेठेशी जोडला जाणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!