‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषात मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या १५ शाखांचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चा फलटण या पंधरा शाखांचे उद्घाटन ‘एक मराठा लाख मराठा’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने झाले. दरम्यान, हा उद्घाटन सोहळा व शाखांचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते तब्बल पंधरा गावात करण्यात आले. यावेळी सर्व तरुण, तरुणी व मराठा समाजातील लोक व सर्व मुख्य समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्या त्या गावात जाऊन या शाखा स्थापन करण्यात आल्या असून पुढील अजून शंभरहून अधिक शाखा राहिलेल्या प्रत्येक गावात स्थापन लवकरच करण्यात येणार आहेत, असे समन्वयकांनी सांगितले आहे.

दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चा फलटण या शाखा राजकारणविरहित समाज हितासाठी व एकमेकांना मदत करीत आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून या संकल्पनेतून सर्वांनी एकत्र येत ‘एक मराठा लाख मराठा’ न राहता तो ‘एक मराठा कोटी मराठा’ झाला पाहिजे. त्यातून समाजहित जोपासण्यासाठी सर्व फलटण तालुक्यातील मराठा समाज राजकारणविरहित एकवटला असून रविवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती मोर्चा फलटण शाखा नंबर एक ही झडकबाईचीवाडी, ता.फलटण येथे सुरू करण्यात आली.
यावेळी पहिला मान मिळालेल्या झडकबाईचीवाडी गावातील सर्व मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत संपूर्ण गावात सडा रांगोळी, भगवे वस्त्र, संपूर्ण परिसर भगवेमय करीत संपूर्ण गावाने एकजूट दाखविली. यावेळी ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांचे आशीर्वाद घेऊन या पहिल्या शाखेचे गावातील महिलांच्या हस्ते उद्घाटन थाटात केले. यावेळी एकच आवाज ‘एक मराठा लाख मराठा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता, तर त्याच वेळी महिलांनी फेटे, मुलांनी भगव्या टोप्या डोक्यावर घालून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.

दरम्यान, त्यानंतर दुसरी शाखा मिरेवाडी, ता.फलटण येथे स्थानीक महिलांनी त्याचे उद्घाटन केले. यावेळी संपूर्ण गाव एकवटले होते. तसेच तिसरी शाखा भैरवनाथ कृपेने डोंगरदर्‍या व घाट पायथ्यावर वसलेले सुंदर नयनरम्य परिसर असलेल्या ताथवडा गावात झाली. यावेळी गावातील सर्वच महिलांनी भगवे फेटे, भगव्या साड्या परिधान करीत उद्घाटन सोहळ्यात सहभागी लोकांची संपूर्ण गावातून वाजत गाजत ढोल ताश्यांच्या व तुतारीच्या निनादात मिरवणूक काढली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले, व गावातील महिलांच्या हस्ते त्या शाखेचे जोरदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी ताथवडा गावातील मराठा समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होत संपूर्ण परिसर शिवमय केला होता,यावेळी गावाची एकजूट काय असते ते दाखवून देत संपूर्ण मार्गावर रांगोळी,स्वच्छता व शब्द सुमनांनी स्वागत करीत तरुणाई त्या ठिकाणी अक्षरशः लोटली होती.

तसेच चौथी शाखा पिराचीवाडी या सुंदरतेची लीलया असलेल्या गावात स्थानिक महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,पाचवी शाखा वाघोशी येथील तरुणांच्या साक्षीने उपस्थित महिलांच्या हस्ते उद्घाटन झाले,सहाव्या शाखेचा मान मिळाला तो कोर्‍हाळे या गावाला,कोर्‍हाळे गाव म्हणजे भक्तिमय जीवन जगणे व त्याच बरोबर इतरांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे गाव त्या गावातील मराठा समाजातील तरुण अतिशय प्रामाणिक व कष्टाळू या गावात सर्वजण एकत्र येत भगव्याच्या साक्षीने व छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीने प्रेरित झालेल्या गावात अतिशय दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर सातवी शाखा वडगाव या छोट गाव पण महान कामगिरी असलेल्या व एकजीवाणे कसे राहावे व नेहमीच मराठा समाजाला मदतीला धावून येणार्‍या गावात भगव्यामय वातावरणात तेथील महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,तसेच आठवी शाखा अशा गावात स्थापन करण्यात आली की मराठा म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत सुख दुःखात सहभागी व्हायचे याची शिकवण देणार्‍या व वृक्षारोपण करीत फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याला वृक्षारोपण कसे असावे व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणार्‍या संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेल्या व अतिशय कष्ठाळू असलेल्या व बहू संख्येने मराठा असलेल्या बिबी या गावात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणाबाजी करीत महिलांच्या हस्ते तेथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

नऊ हा अंक शुभ मानला जातो आणि ती शाखा नंबर ही नऊ मिळालेले गाव ही तसेच शुभ आहे ते म्हणजे घाडगेवाडी ता.फलटण , घाडगेवाडी म्हटलं की एकच नाव पुढे येते ते म्हणजे शंभू महादेवाचा आशीर्वाद, व महाशिवरात्री चा योगायोग काल्याचे कीर्तन असा दुग्धशर्करा योगायोग प्रचंड गर्दी आलेले मराठा समाज बांधव,ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी,युवकांचा जल्लोष,संपूर्ण भगवेमय वातावरण आणि याच शंभू महादेवाच्या गावात असलेल्या एकोपा,एकोपा काय असतो आणि गावात होत असलेली समाजाला मदत गावाची एकजूट अशा प्रकारच्या भक्तिमय वातावरण घाडगेवाडी येथील शाखेचे उद्घाटन तरुणींच्या हस्ते दिमाखदार पार पडले यावेळी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहावी शाखा स्थापन झाली त्या मुळीकवाडी ता.फलटण या गावात मोठमोठी मंदिरे,गावात असलेले धरण,तरुणांची असलेली फौज,त्यांच्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पगडा अशा गावात स्थानिक महिलांच्या हस्ते शाखेचे अतिशय सुंदरतेणे व हिरवाईची झालर असलेल्या बागायती गावात झाले, अकरावी शाखा गावापासून दूर आपापल्या शेतात घरे बांधून कमी असले तर आम्ही शिवरायांचे सच्चे मावळे आहोत,आम्ही समाजाचे हित पाहतो,आम्ही समुद्र नाही पण झरा आहोत,झर्‍याचे पाणी गोड असते समुद्र खारट असतो,व जिथं मराठ्यांचा संगम होतो अशा संगमनगर(नांदल) येथे स्थानिक महिलांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी चिमुकल्या मुलांनी सांगितलेला पोवाडा,व छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती खरोखरच डोळे दिपावणारी होती.

दरम्यान, बारावी शाखा ढवळेवाडी ता.फलटण येथे स्थापन करण्यात आली ढवळेवाडी म्हणजे जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या कमिन्स कंपनीच्या जवळ असलेले गाव,गावातील मराठा समाज अतिशय लोकप्रिय असून गावाला एक वेगळे महत्व आहे,आणि त्यासाठी त्यांचा एकोपा संपूर्ण फलटण तालुक्यात ऐकविला जातो,मराठा क्रांती मोर्चा फलटण ने ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी आपले बांधव आपल्या हक्कासाठी तिथे बसले आहेत मग आपणही त्या मध्ये सहभागी झाले पाहिजे मग गावातील संपूर्ण महिला भगिनींनी एकत्र येऊन झुंका व भाकरी करून पाठवल्या होत्या त्याची आठवण अजूनही राहिली आहे. मग मराठा क्रांती मोर्चा शाखा आपल्या गावात होत आहे आणि तीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी मग काय शिवजयंती व शाखा उद्घाटन याचा योगायोग आल्याने गावात भगवेमय वातावरण सर्वत्र पसरलेले गावातील प्रत्येक मराठा सरदार जणू काही शिवमय झाला होता, अशा भगव्या वातावरणात स्थानिक महिला व युवतीच्या हस्ते या मराठा क्रांती मोर्चा फलटण शाखेचे उद्घाटन दैदिप्यमान झाले.

तेरावी शाखा निंभोरे या गावात स्थापन करण्यात आली, निंभोरे म्हणजे रणवरे सरदार सरदारांचा गावात मराठा क्रांती मोर्चा फलटण शाखा स्थापना होणार म्हटल्यावर संपूर्ण गाव एकवटलेले पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्याच दिवशी निंभोरे येथील मराठयांनी गटतट बाजूला सारून शेकडोंच्या संख्येने एकत्र येत क्रांती घडविली आणि ज्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा शाखा स्थापन झाली त्या गावातील ऐतिहासिक चौकाला “क्रांती चौक”असे नामकरण केले,यावेळी मराठा समाजातील महिला व युवक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर यावेळी माँ जिजाऊंच्या रुपात आलेल्या चिमुकल्यानी सर्वांची मने जिंकली होती,यावेळी या ऐतिहासिक चौक नामकरण व शाखेचे उद्घाटन उपस्थित महिलांच्या हस्ते व तरुणाईच्या साक्षिणे दिमाखदार व एक मराठा लाख मराठा घोषणेत करण्यात आले.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा फलटण ची चौदावी शाखा काशीदवाडी या गावात स्थापन करण्यात आली या शाखेचा उद्घाटनप्रसंगी महिलांनी केलेले वक्तव्य म्हणजे मराठा समाजाला एकत्र या ही हाक दिली व न्हवे एकत्रच आले पाहिजे व राहिलेही पाहिजे असा संदेश दिला, मराठा समाज एकवटताना ब तो येताना माझा समाज कसा प्रगती करेल, व सर्वांना बरोबर घेऊन येणार्‍या काळात मदतीला धावून जाईल हे पाहणे गरजेचे असून त्यासाठी राजकारण बाजूला सारून आपली एक वेगळी ओळख निर्माण करीत समाजोपयोगी कार्य करेल ही काळाची गरज असल्याचे सांगून या शाखेची गरजच होती असे ठामपणे सांगत तुम्ही आम्ही एक मराठा लाख मराठा नाही आता एक मराठा कोटी मराठा हाक दिली पाहिजे असा संदेश दिला व या ठिकाणी असलेली तरुणांची उपस्थिती मोठी होती.

शेवटची शाखा वडजल ता.फलटण या ठिकाणी स्थापन करण्यात आली वडजल वडजाई मातेच्या पद स्पर्शाने पावन झालेले गाव, छत्रपती शिवाजी महाराज यांना आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद होता तसाच आशीर्वाद या वडजल गावाला असून त्याच मातेच्या मंदिराजवळ व आळंदी पंढरपूर या भक्ती मार्गावर स्थापन झाली असून भगवे फेटे व भगवेमय वातावरण चौहू बाजूनी हिरवागार परिसर,सामाजिक बांधिलकी जोपासणारे गाव व गावातील मराठा तरुण त्यांची असलेली युनिटी व समाजासाठी काळ्या रात्रीची हाक मारा आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा शब्द देत केलेले स्वागत व असलेला मराठा समाजाचा दबदबा मनाला उभारी देणारा ठरला व तब्बल एकाच दिवसात पंधरा शाखा स्थापन झाल्याचा आनंद वडजल या गावाने दिलेल्या शब्दाने द्विगुणित होत फलटण तालुक्यातील मराठ्यांची ताकद वाढविणारा ठरला व येणार्‍या फलटण तालुक्यातील उरलेल्या अजून शंभर शाखेंसाठी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद लाभेल असे सर्व समन्वयकांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!