स्थैर्य, सातारा दि. 30 : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नुकतेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सचिन जाधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उमेदवारांकडे रोजगाराभिमुख कौशल्य आवश्यक आहे अणि त्यासाठी कौशल्य वाढविणे गरजेचे आहे. स्कील वाढविण्यासाठी कोणावर अवलंबून राहू नये. उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्तपदे अधिसूचित करुन त्यांची जबाबदारी पार पाडली. 100 टक्के रिक्तपदे भरण्यासाठी उमेदवार कमी पडले असे होऊ नये. मागील मेळाव्यात 115 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली, असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत म्हणाले, सोशल मिडीयाचा वापर कसा करावयाचा हे समजल्यास विभागचे उद्दिष्ट साध्य होईल. प्रत्येक गोष्ट युट्युब, गुगलवर उपलब्ध आहे. आता पदवीवर नोकरी मिळण्याचे दिवस गेले आहेत. जो प्रशिक्षित आहे, त्याला नोकरी मिळते. सध्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. त्याचा वापर करुन आपण आपले स्कील वाढवावे असे आवाहन योवळी केले.
योवळी किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2019-20 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या 9 कौशल्य प्रशिक्षण संस्थांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात 4 उमेदवारांना कौशल्य विकास प्रमाणपत्र व किमान कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले.