लायन्स क्लब फलटणचा आज पदग्रहण सोहळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांचा पदग्रहण सोहळा आणि नूतन सदस्य शपथविधी आज, शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित केला आहे.

या सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून प्राचार्य एमजेएफ लायन डॉ. राजेंद्र शहा, नूतन सदस्य शपथदाते म्हणून लायन पीएमजेएफ भोजराज नाईक निंबाळकर उपस्थित राहणार असून यावेळी एमजेएफ माजी प्रांतपाल लायन पांडुरंग शिंदे, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन के. डी. जाचक, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन प्रभाकर आंबेकर, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन मिलिंद शहा, पीएमजेएफ माजी प्रांतपाल लायन जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन लायन दिलीप वहाळकर, झोन चेअरमन लायन विजयकुमार लोंढे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन डॉ. तुषार गायकवाड, लायन्स क्लब फलटण गोल्डनचे अध्यक्ष लायन नीलम देशमुख, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन वैशाली चोरमले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!