दैनिक स्थैर्य | दि. १५ जुलै २०२४ | फलटण |
लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डन तसेच लायन्स क्लब प्लॅटिनम यांचा पदग्रहण सोहळा आणि नूतन सदस्य शपथविधी शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे आयोजित केला होता.
या सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून प्राचार्य एमजेएफ लायन डॉ. राजेंद्र शहा, नूतन सदस्य शपथदाते म्हणून लायन पीएमजेएफ भोजराज नाईक निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी क्लब सदस्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले आणि यावेळी एमजेएफ माजी प्रांतपाल लायन पांडुरंग शिंदे, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन के. डी. जाचक, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन प्रभाकर आंबेकर, एमजेएफ माजी प्रांतपाल लायन मिलिंद शहा, पीएमजेएफ माजी प्रांतपाल लायन जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन लायन दिलीप वहाळकर, झोन चेअरमन लायन विजयकुमार लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लायन्स क्लब फलटणचे लायन डॉ. तुषार गायकवाड, लायन्स क्लब फलटण गोल्डनचे अध्यक्षा लायन नीलम देशमुख हे उपस्थित होते. त्यांनी मागील वर्षातील केलेल्या उपक्रम आणि उत्कृष्ट कार्याबद्दल सहा बक्षीस (ट्रॉफी) मिळाली असल्याची माहिती दिली.
लायन्स क्लब फलटणचे नूतन अध्यक्ष म्हणून जगदीश करवा यांनी शपथग्रहण केले. तसेच लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या नूतन अध्यक्षा म्हणून लायन सौ. स्वाती संदीप चोरमले यांनी शपथ घेतली आणि लायन्स क्लब प्लॅटिनमच्या नूतन अध्यक्षा संध्या फाळके यांनी शपथ घेतली. यावेळी तिन्ही अध्यक्ष यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात करण्यात आला.
नूतन अध्यक्ष जगदीश करवा यांनी त्यांची १० गुंठे जागा लायन्स क्लबसाठी देणार असल्याचे सांगितलं आणि क्लबच्या माध्यमातून भरीव काम करणार आहे, असे सांगितले.
यावेळी लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या नूतन अध्यक्षा स्वाती चोरमले या म्हणाल्या की, अपंग क्षेत्रामध्ये आणि गरजू महिलांसाठी भरीव काम क्लबच्या पदाधिकारी सदस्यांच्या सहकार्याने करणार आहे. प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन संध्या फाळके क्लबच्या माध्यमातून चांगले काम करणार आहे असे म्हणाल्या.
लायन्स क्लब फलटणच्या सेक्रेटरीपदी महेश साळुंखे तसेच खजिनदारपदी रणजित बर्गे यांची निवड झाली. लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या सेक्रेटरी म्हणून लायन सौ. संध्या गायकवाड आणि खजिनदारपदी लायन सीता जगताप यांची निवड झाली. प्लटिनमच्या सेक्रेटरीपदी ललिता ढवळे आणि खजिनदारपदी डॉ. दिव्या रसाळ यांची निवड झाली.
एमजेएफ प्रा. डॉ. राजेंद्र शहा यांनी तिन्ही क्लबचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना शपथ देऊन त्यांचे कार्य सांगितले आणि सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रविंद्र बेडकिहाळ, डॉ जे. टी. पोळ उपस्थित होते. लायन रणजित बर्गे यांनी आभार मानले.