
दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । फलटण । फलटण दिनांक २४/७/२०२२ रोजी फलटण गौरीशंकर बंगला, लक्ष्मी नगर, फलटण या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात लाईन्स क्लबच्या अध्यक्ष सौ.सुनीता कदम यांनी घटनादाने केली. यानंतर ध्वजवंदन सौ.सुजाता सोनवलकर यांनी केले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेलविन जोन्स फेलो यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर स्वागत गीत सौ.नीलम देशमुख, सौ.पूनम कदम व सौ.वैशाली कांबळे, यांनी सादर केले. चार्टर प्रेसिडेंट सौ.उज्वला निंबाळकर यांनी प्रस्तावित केले.व लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य महत्व, लाईन्स क्लब या संघटनेची माहिती शाखा, स्थापना, याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. सौ.सुनीता कदम, सौ.नीलम देशमुख, सौ.पूनम कदम यांनी सन २०२१ व २२ या वर्षातील संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन अंदाजे अबिलिटी करून सुमारे २ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम वैद्यकीय शिबिरे, वृक्षारोपण, बालक-पालक मिळावे, व्यावसायिक मार्गदर्शन, मधुमेह जनजागृती, इत्यादी सामाजिक कार्य केल्याचा आढावा घेण्यात आला. एम.जे एफ जगदीश पुरोहित यांनी अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात प्रोजेक्टर वरती प्रत्येक पदानुसार बोलक्या रेखांद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून संगीतमय अशा वातावरणात शपथविधी संपन्न केला.
श्री.भोजराज नाईक निंबाळकर यांनी क्लबच्या नवीन १२ सदस्यांना शपथ देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना सदस्यत्व बहाल केले. श्री.महिंद्र खुसपे यांनी रक्त तपासणी यंत्र व ग्लुकोज मीटर देण्याचे जाहीर केले. लायन्स क्लबच्या नूतन नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. सुनंदा भोसले(सचिव)सौ.सुनीता कदम (खजिनदार) सौ.सुजाता सोनुलकर यांनी अध्यक्ष सौ.सुनीता कदम सौ.नीलम देशमुख (सचिव) व सौ.दिपाली निंबाळकर( खजिनदार) यांच्याकडून पदभार स्वीकारला नवनिर्वाचित अध्यक्ष सौ सुनंदा भोसले यांनी 2022-23 या वर्षात स्मार्ट कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे सांगण्यात आले.
श्रीमती सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या व श्री. भोजराज नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापण्यात आला. तसेच सर्व मान्यवर ज्येष्ठ, सदस्य, कांबळे दाम्पत्य, इत्यादींनी शुभेच्छा दिल्या सौ.सुजाता सोनवलकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व राष्ट्रगीतांनी कार्यक्रम संपन्न झाला.