‘लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन’चे खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर असलेल्या फलटण शहरामध्ये सर्व सुविधांयुक्त असलेले लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवनच्या नवीन इमारतीचे लोकार्पण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शेकडो वारकर्‍यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.

या लोकार्पण सोहळ्यास ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर यांचा कृपाशिर्वाद लाभला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वारकरी संघटना फलटण तालुक्याचे संस्थापक ह.भ.प. गणपतराव निकम होते. यावेळी फलटण शुगर साखरवाडीचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समेशरदादा नाईक निंबाळकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, भाजपा फलटण तालुका महिला संघटना प्रमुख अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक नारायण बाबर, दत्तराज व्हटकर, विश्वासराव भोसले, डॉ. जे.टी. पोळ, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन बेडके-सूर्यवंशी, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, डॉ. प्रसाद जोशी, बाळासाहेब भोसले-पाटील, बजरंग गावडे, राजाभाऊ नागटीळे, निलेश पवार, डॉ. राहुल घाडगे, डॉ. सचिन ढाणे, प्रशांत बावळे, बाळासाहेब घनवट, मोहनराव रणवरे, धनंजय पवार, डी. के. पवार, अभिजित नाईक निंबाळकर, विक्रम भोसले, रवींद्र बेडकिहाळ, सचिन यादव, अरविंद मेहता, सुजाता यादव, ज्ञानेश्वर सावंत, अशोकराव शिर्के, संजय घाडगे, नितीन जगताप, विश्वासराव धुमाळ, रमेश सोनावणे, एस. एम. घाडगे, तुकाराम कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकार्पण सोहळ्यादिवशी सकाळी सत्यनारायण महापूजा सौ. छायादेवी व ह.भ.प. केशवराव जाधव महाराज, सौ. अनुराधा व किशोर गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर वारकरी ध्वजपूजन सौ. गौरी व कुमारजी भट्टडसोा व सौ. वनिता व दौलतराव घनवटसोा यांच्या हस्ते झाले. सकाळी १०.३० ते ११.३० वाजता सांप्रदायिक भजन व ११.३० ते १२.३० वाजता उद्घाटन व मान्यवरांची मनोगते झाली. दुपारी १.०० ते २.०० प्रसाद वाटप कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फलटण तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!