दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
संत नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य याच्या फलटण शहराध्यक्षपदी श्री. करण दत्तात्रय भांबुरे यांची आणि फलटण शहरचे सर्व संचालक व श्री. समाधान महादेव कळसकर यांची संत नामदेव समाजोन्नती परिषदेच्या फलटण ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पदग्रहण व सत्कार समारंभ आज, सोमवारी सायं. ५.०० वाजता श्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, फलटण विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विजय उंडाळे, शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्माताई टाळकुटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी बहुसंख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संत नामदेव समाजोन्नती परिषद फलटण शहर व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
संत नामदेव समाजोन्नती परिषदेची फलटण शहर कार्यकारिणी अशी : करण भांबुरे (अध्यक्ष), श्रीकांत मुळे (उपाध्यक्ष), ज्ञानराज पोरे (खजिनदार), संचालक -चंद्रशेखर हेन्द्रे, राजेश हेन्द्रे, महेश हेन्द्रे, सुनील पोरे, राहुल जामदार, अॅड. राहुल टाळकुटे, महेश उरणे, मृणाल पोरे, मधुकर मुळे, श्रीमती सुलभा मोहोटकर, श्रीमती रेखा हेन्द्रे, मनीष जामदार.
संत नामदेव समाजोन्नती परिषद फलटण तालुका ग्रामीण कार्यकारिणी अशी : समाधान कळसकर (अध्यक्ष), संजयकुमार बाचल (उपाध्यक्ष), संजय किकले (सचिव), अविनाश कुमठेकर (खजिनदार), संचालक – शीतल लंगडे, राजेंद्र मोहोटकर, सूरज बेंद्रे, रोहित नामदास.
दरम्यान, नवनिर्वाचित कार्यकारिणीचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील सर्वच पक्षांच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.