जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंटचे व ध्वज केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे व ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन मुख्य अधिकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तिरंगा घेऊन काढला सेल्फी.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवारला नाही. त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन स्वत:चा सेल्फी काढला.

जिल्हा परिषदेतील तिरंगा ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जीवनोन्नती अभियानांतर्गत घरो घरी तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा ध्वज विक्री केंद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्धाटन श्री. गौडा यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. गौडा यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील मैत्री स्वयंसहाय्यता समूहामार्फत जिल्हा परिषद आवारात प्रदर्शन व तिरंगा ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये तिरंगा व स्वयंसहाय्यता गटामार्फत उत्पादित विविध वस्तूं ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शन सोमवार दि. 14 ऑगस्ट 2022 पर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 6 पर्यंत सुरु असणार आहे.
या विक्री स्टॉल लगत ठेवण्यात आलेला सेल्फी पॉईंट जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यांगतांसाठी आकर्षण ठरत आहे.


Back to top button
Don`t copy text!