
दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संगम माऊली येथे उभारलेल्या कैलास स्मशान भूमी मध्ये 22 फूट उंचीवर गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे या उपक्रमासाठी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित असून येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे सचिव संजय कदम,व्यवस्थापक जगदीप शिंदे, सदस्य दीपक मेहता,उदय गुजर, नितीन माने, जगदीश खंडेलवाल, इत्यादी उपस्थित होते.
चोरगे पुढे म्हणाले,”सदर गॅस दाहिनी ही कॅन्सर दुर्धर आजार किंवा पोस्टमार्टम झालेल्या मृत व्यक्तींच्या तसेच मृत व्यक्तींच्या पश्चात घरी अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त महिलावर्ग किंवा कोणीच नसते अशा मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनी वापरण्यात येणार आहे या दाहिनीची उभारणी 22 फूट उंचीवर केली जाणार असून त्याकरिता 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हा खर्च सदस्य वर्गणी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून केला जाणार आहे यासाठी प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी 14 किलोचा गॅस सिलेंडर वापरला जाईल त्याचा अंदाज घेऊनच प्रति अंत्यसंस्कार किती शुल्क आकारायचे याचा निर्णय घेतला जाईल 2003 मध्ये उभारलेल्या कैलास स्मशानभूमी मध्ये 28 हजार 50 अंत्यसंस्कार करण्यात आले असून करोना काळात सुद्धा साडेचार हजार अंत्यसंस्कार कोणत्याही पार्थिवाची अवहेलना न करता करण्यात आले शासनाला अशा पद्धतीने मदत करणारी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट अशी एकमेव संस्था आहे प्रामुख्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाच्या ऐवजी शेणीचा वापर केल्यामुळे परिसरातील 35 ते 40 हजार झाडे वाचले आहेत अंत्यसंस्कारानंतर उरलेली राख असती पाण्यात न टाकता अस्थि कुंडामध्ये साठवून त्यापासून खत निर्माण केले जाते कैलास स्मशानभूमीत लाईटचे नियोजन सोलरवर असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या व्यक्ती कोणत्याही प्रकारची व्यसन करून आत येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी सात कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी व्यवस्था आहे गॅस दाहिनीची चिमणी शंभर फूट उंच असून तेथील धुरावर योग्य ती प्रक्रिया करूनच तो वातावरणात सोडला जाईल यासाठीच्या तांत्रिक प्रक्रिया लवकरच पूर्ण होतील.
संगम माऊली सातारा येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झालेली आणि देखभाल करून कोणतेही शासकीय अनुदान नसताना चालवण्यात येणारी भारतातील एकमेव स्मशानभूमी आहे गॅस दाहिनीमध्ये होणाऱ्यांचं अंत्यसंस्कारा व्यतिरिक्त इतर अंत्य संस्कार हे नेहमीप्रमाणे अग्नि कुंडात १ोणी मध्ये केले जातील साधारण कृष्णा नदीची पूरनियंत्रण रेषा लक्षात घेता कैलास स्मशानभूमीच्या उजव्या बाजूला बैठक व्यवस्थेच्या शेजारी 22 फूट उंचीवर गॅस दाहिनीचा प्लॅटफॉर्म उभा केला जाणार असल्याची माहिती आहे हे काम तातडीने सुरू करून पुढील दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याचे चोरगे यांनी सांगितले.