
दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण – बारामती रोड वरील सोमंथळी गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या काळ्या ओढ्यामध्ये एक ईरटीका गाडी वाहून गेलेली आहे. सदरील गाडीमध्ये चालक व चालकांसोबत एक मुलगी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
काल, दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून फलटण शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढलेले आहे. यामध्ये फलटण शहरासह तालुक्यातील सर्व ओढे नाले हे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. त्यामध्ये ओढ्याचे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे. अशा परिस्थितीत पाण्यामध्ये गाडी घालणे, हे धोकादायक ठरत आहे. तरी चालकांनी काळजी घेवुनच गाडी चालवणे गरजेचे आहे.