कर्करोग निदान शिबिरात शेकडो महिलांची मोफत तपासणी उत्साहात

बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन


सातारा – कर्करोग निदान तपासणी शिबिरात महिलांची तपासणी करताना मान्यवर डॉक्टर पथक. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.14 ऑक्टोबर : शहरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट, कृष्णा चारिटेबल ट्रस्ट. रोटरी क्लब ऑफ सातारा,डॉ. आदित्य महाजन, श्रीकांत निकम या सर्वांच्या संयुक्त विद्यमानेच्या वतीने आयोजित केलेल्या कर्करोग व विविध आजार चिकित्सा आणि तपासणी शिबिराला सातारा शहर तसेच तालुका आणि जिल्ह्यातूनही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख सचिव प्रशांत तुपे हरीश शेठ, रोटरी क्लब ऑफ सातारा अध्यक्ष रोटेरियन किशोर डांगे, सचिव अभिजीत लोणकर, खजिनदार नीरज गांधी, डॉ. आदित्य महाजन, श्रीकांत निकम यांच्यासह मंदिराचे दिलीप आफळे, स्वयंसेवक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या वतीने शेकडो महिलांनी आपली तपासणी करून त्यावर उपचार व निदान जाणून घेतले. या शिबिराची सुरुवात मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात डॉक्टर पथकाने करून कर्करोगासह कान, नाक, घसा अवयवांची ही तपासणी योग्य पद्धतीने केली. सातार्‍यात कर्करोग निदान शिबिराचा हा दुसरा उपक्रम राबवण्यात आलेला आहे.  रोटरी क्लब ऑफ सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सेवकांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण दिवसभर या शिबिरामध्ये सातारा शहर तसेच तालुक्यातील शेकडो महिलांनी या प्रकारची तपासणी प्रथम स्वरूपात करून विशेष तज्ञांकडून मार्गदर्शन प्राप्त केले .

या शिबिरात दात, कान, नाक, घसा तसेच स्तनाचा कॅन्सर आणि महिलांच्या मूत्राश गर्भाशय गर्भाशय पिशवीची तपासणी याबाबत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्या महिलांना या आजाराची अद्याप जाणीव ही जाणीव झाली नव्हती ,त्या आजच्या तपासणी मधून ज्या अशा महिलांना अशा प्रकारचा आजार आहे. त्यांना याबाबत विशेष मार्गदर्शन करून उपचारासाठी सांगण्यात आले.
या शिबिरात अगदी सोळा वर्षांपासून युवती आणि 90 वर्षाच्या वयोवृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. आज संपन्न झालेल्या शिबिरामध्ये घेण्यात आलेल्या सर्व तपासण्या या महिलांनी जर रुग्णालयात जाऊन केल्या तर त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च येत असतो. मात्र या अतिशय सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून जपलेल्या उपक्रमामुळे या सर्व तपासणी झालेल्या महिलांसाठी ही सर्व तपासणी मोफत स्वरूपात देण्यात आली याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रोटेरियन तसेच संस्थांचे विशेष आभार मानले.

या शिबिराबद्दल बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की केवळ धार्मिकच उपक्रम नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून हे कर्करोग निदान शिबिर तसेच उद्या संपन्न होणारे महा रक्तदान शिबिर हे ट्रस्टचे उपक्रमांतर्गत दरवर्षीच भविष्यकाळात घेतले जाणारे उपक्रम असून या उपक्रमाचा लाभ सातारकर आणि मोठ्या संख्येने घ्यावा .आज सामाजिक बांधिलकीच्या नात्यातूनच हा ट्रस्ट वृद्धिंगत होत आहे, संस्कृती जोपासत असताना ती वाढवण्याचे कामही ट्रस्ट करत आहे .आणि त्यासाठी सर्व सातारकरांचा याला हातभार लागत लाभत आहे याचा विशेष आनंद वाटतो .


Back to top button
Don`t copy text!