दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
कुरेशीनगर (ता. फलटण) येथे दि. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १०.०० वाजता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सय्यद आदम कुरेशी (रा. कुरेशीनगर, ता. फलटण) हा जर्सी गाय व खोंड बेकायदेशीररीत्या कत्तल करत असताना मिळून आला. तसेच या ठिकाणी इतर गोवंशीय जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कुरेशी तेथून पसार झाला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी सय्यद आदम कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल केला असून पो.ना. सचिन जगताप यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
या ठिकाणी पोलिसांनी ८०० ते ८५० किलो गोवंशीय जनावरांचे मांस अंदाजे किंमत ८५,००० रूपये, दोन जिवंत जर्शी गाई (वय २ वर्षे) अंदाजे किंमत २० हजार रूपये, दोन जिवंत जर्शी खोंड (वय ४ महिने) अंदाजे किंमत २ हजार रूपये, २९ जर्शी खोंड (वय १० दिवस) अंदाजे किंमत २९ हजार रूपये, एक पियाजो गाडी अंदाजे किंमत ८० हजार रूपये असा एकूण २ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.