‘दिलखुलास’ कार्यक्रमात आर्थिक साक्षरता विषयातील तज्ज्ञ डॉ. व्ही.बी. ककडे यांची मुलाखत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासया कार्यक्रमात आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयातील तज्ज्ञ डॉ. व्ही. बी. ककडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर शनिवार दि. ५ मार्च व सोमवार दि. ७ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आर्थिक साक्षरता ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरता म्हणजे काय, आर्थिक साक्षरतेची गरज,नागरिकांची होणारी फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक झाली तर काय करायचे, तक्रार कुठे नोंदवायची आदी विषयांची माहिती डॉ. ककडे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!