‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. दिलीप बलसेकर यांची मुलाखत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 24 मे, बुधवार 25 मे व गुरूवार 26 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोणत्याही समाजाच्या किंवा देशाच्या प्रगतीत तो देश, समाज इतिहासाच्या कोणत्या वळणावरून पुढे आला, हे नव्या पिढ्यांना ठाऊक असणे आवश्यक असते, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला नेमके काय आहे याचे सामाजिक, भौगोलिक, शास्त्रीय आणि इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचा दर्शनिका विभाग हेच कुतूहल शमविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.त्या- त्या प्रदेशातील सामाजिक, आर्थिक व भौगोलिक सर्वेक्षण करून त्या आधारे वस्तुस्थितीची मांडणी करून भविष्यात उपयुक्त ठरणारे असे हे संदर्भसाधन निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य दर्शनिका विभाग करतो. या विभागाचे कार्य, त्याचा सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!