दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास’ या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक ई. झेड. खोब्रागडे यांची भारतीय संविधान, त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर शुक्रवार दि. २६, शनिवार दि. २७ आणि सोमवार दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतीय संविधानाचे वेगळेपण, देशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिन, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारी, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.खोब्रागडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.